देसले कुटुंबीयांच्या कायमसोबत; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून धीर
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले दिलीप देसले यांच्या कुटुंबीयांची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट घेत सात्वंन केले. कोणतीही मदत भासल्यास माझ्या घराचे दरवाजे देसले कुटुंबासाठी कायम उघडे आहेत. देसले यांचे निधन पनवेलकरांसाठी वेदनादायी आहे. मात्र यापुढे त्यांच्या पश्चात देसले कुटुंबीयांच्या कायमसोबत आहे, अशी ग्वाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली. पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नवीन पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले मृत्युमुखी पडले. त्यांच्या शोकाकूल कुटुंबाची खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी भेट घेत सांत्वन केले.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी धीर देत देसले कुटुंबीयांची विचारपूस केली. या हृदयद्रावक परिस्थितीत मी स्वतः कायम देसले कुटुंबासोबत आहे. कुटुंबाचा शोक मन हेलावणारा आहे. कोणत्याही प्रसंगात आम्ही देसले कुटुंबीयांच्या हाकेला धावत येऊ, हा माझा शब्द आहे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगत देसले कुटुंबाला मोठा धीर दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, ऍड. प्रकाश बिनेदार, समीर ठाकूर, जगदीश घरत, सुधाकर थवई, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, जितेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.
---------