भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कर्जत / वैजयंती जाधव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 129 वी जयंती.त्यांची जयंती दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते, मात्र यावर्षी कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर जयंती घरोघरी साजरी करण्यात आली.
दरवर्षी 13 एप्रिल रात्री बारा वाजल्यापासून भीमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यांना कर्जत मधील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र या वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने लॉक डाऊन केले आहे, संचारबंदी असल्याने त्याचे सावट जयंती वर आले आहे.
तालुक्यातील सर्वच समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या अर्धपुतळा, प्रतिमेस विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, नागरिकांनी, भीमसैनिकाने घरात बसून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी देशात कोरोना विषाणूचे संकट आले आहे, ते लवकरात लवकर दूर व्हावे अशी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे प्रार्थना केली.
कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी कर्जतच्या प्रथम नागरिक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कर्जतकरांच्यावतीने अभिवादन केले.कोरोना संकट लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना केली.