व्यक्तीचे हुबेहूब चित्र रेखाटणारी दिप्ती लभडे,शिक्षक,ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप !
दिप्ती लभडे हीने दिड वर्षाच्या मुलीचे रेखाटलेले चित्र सोबत ती मुलगी (छाया काशिनाथ जाधव )
प्रतिनिधी / काशिनाथ जाधव
ग्रामीण भागातील मुली खूप हुशार असून काही वेळा हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांच्या कलेला वाव मिळत नाही.आणी काही वेळा ही त्यांच्याजवळ असलेली कलेचा सराव होत नसल्यामुळे हळु - हळु कमी होवून लोप पावत आहे.खालापूर तालूक्यातील वारद गावातील असलेली दिप्ती विलास लभडे ही डॉ.पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली येथे आठवी चे शिक्षण घेत असतांना चित्र काढण्याची कला अवगत केली असून आजपर्यंत शेकडोहून अधिक चित्र तीने काढली आहे.
यामध्ये गणपती,छत्रपती शिवाजी महाराज,गरभा नृत्य करणाऱ्या मुली,विद्यार्थी,निसर्ग चित्र, प्राणी विशेष म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे हुबेहूब चित्र रेखाटण्याची कला अवगत असल्यामुळे तीच्या या कलेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.तिने काढलेले चित्र पाहून पाहुन आनेकांनी तीला कौतुकाची धाप मिळत आहे.मात्र हक्कांचे व्यासपीठ मिळत नसल्यांची खंत तीने व्यक्त केली आहे.व्यक्तीचे हुबेहूब चित्र रेखाटत असतांना ते चित्र अत्यंत मनमोहन असल्यामुळे आजपर्यंत अनेकांनी स्वताचे रेखाचित्र काढून घेतले आहे.
तीला ही चित्रकलेची आवड सहावी मध्ये असतांना जडली आणी विशेष म्हणजे तीच्या मध्ये असलेली ही कला अशिच सुरु ठेवण्यासाठी तीच्या बहिणीने सांगितले यामुळे तीने आजवर शेकडो रेखाचित्र काढली असल्यामुळे तीचे सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.शिवाय शाळेतील शिक्षकांचा वेळोवेळी सहकार्य मिळत असल्यामुळे तीने ही कला आजपर्यंत जिवंत ठेवली आहे.एका दिड वर्षाच्या मुलीचे भक्ती लभडे हीचे हुबेहूब चित्र रेखाटल्यांने तीच्या कलेला पाहून अनेक जण अचंबित होत आहे.
===========
जाहिरात
============