जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने शिशुविहार विद्यामंदिर, बदलापूर गावं येथे सॅनिटरी पॅडचे वाटप...!

जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने शिशुविहार विद्यामंदिर, बदलापूर गावं येथे सॅनिटरी पॅडचे वाटप...!

बदलापूर / गुरूनाथ तिरपणकर

शाळेतील कीशोरवयीन मुली, शारीरिक जडणघडण, मासिक पाळी, आरोग्य, स्वच्छता आणि उपाय यासंदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे.म्हणूनच जनजागृती सेवा संस्थेने बदलापूर गावं या ग्रामीण विभागातील शिशुविहार विद्यामंदिर येथील मुलींना संस्थेच्या वतीने सॅनिटरी पॅडचे वाटत करण्यात आले.

याप्रसंगी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या क्रीयाशील आशा स्वंय सेविका संजीवनी पाटील यांनी वयात येणारी मुलींची शारीरिक वाढ, मासिक पाळी, आरोग्य, स्वच्छता व इतर मुलभूत आणि आवश्यक गोष्टींची माहिती उपस्थित मुलींना करून देण्यात आली.

सॅनेटरी पॅडचा वापर कसा करावा व त्याची कशाप्रकारे विल्हेवाट लावावी या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन व समूपदेशन संजीवनी पाटील यांनी उत्कृष्टरित्या केले.याप्रसंगी शिशुविहार विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा विद्याताई साठे यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.

शिशुविहार विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने अध्यक्षा विद्याताई साठे यांनी प्रमुख पाहुणे माजी कमांडींग ‌‌ऑफीसर'ई'परिमंडळ बृहन्मुंबई, राष्ट्रपती पदक सन्मानित तसेच जनजागृती संस्थेचे जेष्ठ सल्लागार, मार्गदर्शक दिलीप नारकर, संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांना'मायदेशीच्या लोककथा'हे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.विद्याताई साठे मॅडम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जनजागृती सेवा संस्थेच्या वतीनेही विद्याताई साठे व शाळेच्या मुख्याध्यापिका अलका तारु यांना आभार पत्र,शाल, गुलाबपुष्प देऊन आभार मानण्यात आले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आशा स्वंय सेविका संजीवनी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.ग्रामीण भागात यासंदर्भात अनास्था आहे.त्यामुळे हा उपक्रम ग्रामीण विभागातील शाळेमध्ये घेण्यात आला.

यावेळी शाळेतील शिक्षिका प्रतिभा गडकरी, रेश्मा कांबळे, वैशाली दोडके तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

 ---------

Popular posts
रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशन दुकानदाराविरुध्द तक्रार देण्यासाठी काय करावे !
Image
रिलायन्स फाऊडेंशन स्कुल लाेधिवली यांना जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारूद्र नाळे यांचा आदेश - रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, लोधिवली यांनी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ व नियमावली १९८१ नुसार कार्यवाही करावी.
Image
ग्रुप ग्राम पंचायत माजगांव मध्ये पुन्हा महिला राज, उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी
Image
दिपकदादा पाटील मराठा योध्दा गौरव पुरस्काराने सन्मानित.
Image
मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे, क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी मोलाचे सहकार्य
Image