मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे, क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी मोलाचे सहकार्य

मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे, क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी मोलाचे सहकार्य.                    


प्रतिनिधी / गुरुनाथ तिरपणकर

 राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत'क्षयरोग मुक्त भारत अभियान'निक्षय शिबिरांचे आयोजन भारतभर करण्यात येत आहेत.या शिबिरात जोखमीच्या व्यक्ती म्हणजेच वृध्दाश्रम, अनाथाश्रम, व्यसनमुक्ती केंद्र, जेष्ठ व्यक्ती, मधुमेही व्यक्ती, बीएमआय कमी असलेल्या व्यक्ती,टी बी ऋग्णांचे सहवासित अशा सर्वांची या शिबिरात तपासणी करून, क्षयरोग रुग्ण शोधून त्यांचेवर उपचार करणे.हा या अभियाचा मुख्य उद्देश आहे.

याच अभियानाचा भाग म्हणून पालघर जिल्हा क्षयरोग केंद्र अधिकारी डॉ.शशिकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी माजगावकर आणि त्यांचे सहकारी तंत्रज्ञ यांच्या अधिपत्याखाली मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्र,चांदीप,विरार(पूर्व) येथे दाखल असलेल्या व्यक्तींची क्षयरोग चाचणी(CY-TB TEST)व एक्स-रे काढण्यात आले.

यासाठी वस‌ई तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अंतरा सोनी आणि त्यांचे क्षयरोग पथक(ग्रामीण) यांच्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्र, पारोळा येथील डॉ.संकेत हेगडे व त्यांच्या आरोग्य सेविका या सर्वांचे विशेष सहकार्य मिळाले.याप्रसंगी मिरॅकल फाउंडेशन येथे दाखल असलेल्या व्यक्ती व या ठिकाणी कार्यरत असलेला संपूर्ण स्टाफ अशा एकूण१०४व्यक्तींची क्षयरोग चाचणी(CY-TB) आणि एक्स-रे घेण्यात आले.

यावेळी मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मनोहर यादव हे देखील उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वस‌ई तालुका क्षयरोग पर्यवेक्षक श्री.योगेश पाटील, मिरॅकल फाउंडेशन युनिट Maheshwari  केंद्र प्रमुख श्री.पंकज कौरा, स्टाफ श्री.झीशान, श्री.अनिकेत व समन्वयक श्री.रमेश सांगळे यांनी विशेष पुढाकार घेतला.

'क्षयरोग मुक्त भारत अभियान'या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी मिरॅकल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री.सुभाष(बाबूजी)मनराय यांनी जिल्हा क्षयरोग केंद्र, पालघर येथे पाठपुरावा केला.

---------

Popular posts
रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशन दुकानदाराविरुध्द तक्रार देण्यासाठी काय करावे !
Image
ग्रुप ग्राम पंचायत माजगांव मध्ये पुन्हा महिला राज, उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी
Image
रिलायन्स फाऊडेंशन स्कुल लाेधिवली यांना जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारूद्र नाळे यांचा आदेश - रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, लोधिवली यांनी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ व नियमावली १९८१ नुसार कार्यवाही करावी.
Image
दुय्यम निबंधक खालापुर गणेश चव्हाण यांचे हस्ते विकास इलेव्हन अॅड. टिमच लेदर बॉल किकेट प्रॅक्टीसच शुभारंभ...
Image
दिपकदादा पाटील मराठा योध्दा गौरव पुरस्काराने सन्मानित.
Image