दिपकदादा पाटील मराठा योध्दा गौरव पुरस्काराने सन्मानित.
रसायनी / राकेश खराडे
वावर्ले चौक येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक दादा गणपत पाटील यांना गुरुवार दि.4 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे क्रांतीसुर्य शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मराठा योध्दा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षणासाठीच्या अखंड लढ्यात खारीचा वाटा म्हणून समाजाच्या न्याय हक्कांसाठी प्रखर आवाज बुलंद केल्याबद्दल दिपक दादा पाटील यांना खासदार भाऊसाहेब वाकचौरे ,महाराष्ट्र राज्य महावितरणाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या हिंगोली,बिड जिल्ह्यांतील मराठा बांधवांची दोन दिवस राहण्याची व इतर सर्व व्यवस्था दिपक पाटील यांनी केली. त्यांच्या कार्याची दखल घेवून दिपक दादा पाटील यांना मराठा योध्दा गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी भाऊसाहेब वाकचौरे ( शिर्डी लोकसभा मतदारसंघ),प्रभावती ताई घोगरे (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिर्डी विधानसभा) ,संदीप भाऊ सोनवणे (अध्यक्ष राहता तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) , खंडू अण्णा सातपुते (अध्यक्ष क्रांतीसुर्य शेती व शिक्षण विकास संस्था) ,गोरक्ष चांगदेव भवर (सचिव क्रांतीसुर्य शेती व शिक्षण विकास संस्था), कांनसा वारणा फाउंडेशनचे पदाधिकारी तथा सामाजिक राजकीय क्षेत्रातील उपस्थित मान्यवर होते.
---------

