ग्रुप ग्राम पंचायत माजगांव मध्ये पुन्हा महिला राज,उपसरपंच पदि सौ.वंदना सुधाकर महाब्दी
प्रतिनिधी :- काशिनाथ जाधव
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव उपसरपंच अपर्णा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्राम पंचायत कार्यालयात निवडनुक अधिकारी ग्रामसेवक संदीप धारणे यांनी सरपंच दिपाली नरेश पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज कार्यालयात दाखल करण्यासाठी कळविण्यात आले होते.
उप सरपंच पदाकरीता सौ.वंदना सुधाकर महाब्दी व शशिकांत पाटील यांचे सकाळी उमेदवारी अर्ज दाखल झाल्या नंतर निवडनुक घेण्यात आली यामध्ये वंदना महाब्दी यांना ७ मते पडून त्या विजयी झाल्या तर प्रति स्पर्धी उमेदवार शशिकांत पाटील यांना ३ मते पडली असल्यामुळे त्यांना उपसरपंच पदाच्या निवडनुकीत पराजयाला सामोरेज जावे लागले.
सौ.वंदना सुधाकर महाब्दि यांची ग्रुप ग्राम पंचायत माजगांवच्या उपसरपंच पदाच्या निवडनुकीत विजयी झाल्यांने त्त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
ग्रूप ग्राम पंचायत माजगांवच्या सरपंच पदाचा कारभार हा सौ .दिपाली नरेश पाटील या पाहत असतांना आता पुन्हा उप सरपंच महिला असल्यामुळे ग्रुप ग्राम पंचायत माजगांव मध्ये महिला राज ,गावातील विकासांची दोरी पुन्हा महिलांच्या हाती असल्यांचे नागरिकात बोलले जात आहे.
सौ.वंदना सुधाकर महाब्दी यांनी ग्रामसेवक संदीप धारणे,सरपंच दिपाली नरेश पाटील,सदस्य सरिता वाघे,वैशाली महाब्दी,राजेश पाटील प्रांजळ जाधव अदिच्या उपस्थितीत वंदना सुधाकर महाब्दी यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला.
सौ.वंदना सुधाकर महाब्दी यांची उप सरपंच पदाची निवड होताच चाहत्यांनी फटाक्याची अतिषबाजीत करत विजय उत्सव साजरा करत शुभेच्छा दिल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती खालापूर- जयवंत पाटील, विलास कांबळे,सुर्यकांत कांबळे,नरेश पाटील,महेश महाब्दी,सुरेश महाब्दी,नितिन महाब्दी,सागर महाब्दी,दिपक जाधव,संदिप जाधव,मंगेश पाटील,मोतिराम वाघे,बाबु वाघे,मारुती ढवाळकर,यशवंत शिंदे,जयेश पाटील,अमित पाटील अदि सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------
