मंगेश खोत डोंबिवली शहरातील एक अवलीया प्राणी मित्र.

मंगेश खोत डोंबिवली शहरातील एक अवलीया प्राणी मित्र.

     


                           

प्रतिनिधी  / गुरुनाथ तिरपणकर

नैसर्गिक सानिध्यात रहाणारे बरेच प्राणी मित्र आहेत.प्राण्यांबद्दल आत्मियता आणि त्यांच्यासाठी काम करणे हाच त्यांचा ध्यास असतो.असेच  डोंबिवली शहरातील एक अवलीया प्राणी मित्र मंगेश खोत.मंगेश खोत हे बरीच वर्षे डोंबिवली पुर्व येथे रहातात.ते आर एस एस चे कार्यकर्ते आहेत.तसेच मंगेश खोत हे आर एस एस कार्यालय डोंबिवली आणि के डी एम सी ग्राऊंड डोंबिवली पूर्व येथे योगाचे क्लास घेतात.

त्यांनी आगळा वेगळा एक चांगला ग्रुप तयार केला आहे.रोज ते ग्राऊंडवर येताना परिसरातील सर्व कुत्रांना जेवण व बिस्किटे खाऊ घालतात.जखमी कुत्रांवर उपचार करतात व त्यांची मलम पट्टी करतात.मंगेश खोत ग्राऊंडवर येताच सर्व कुत्रे घोळखा करुन त्यांच्यावर खाणे देण्यासाठी आग्रह करतात व तेवढच प्रेमही करतात.

मंगेश खोत यांनी कुत्रांना वेगवेगळी नावे ठेवली आहेत त्यांच्या नावाने हाक मारल्यावर तेवढ्याच प्रेमाने ते जवळ येतात.रोज पाणी व जेवण ते घेऊन येतात व खाऊ घालतात.त्यांच्या या कृतीशील कार्याबद्दल ग्राऊंडवरील सर्वच लोक कौतुक करतात.

प्राण्यांच्या संगोपनाबरोबरच ग्राऊंडवरील लोकांना योगा शिकवतात.अशा या त्यांच्या कार्याबद्दल मंगेश खोत या प्राणी मित्र अवलियाचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

 ---------