विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित,यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक.तसेच प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर चौक येथे क्रीडा महोत्सव संपन्न.
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर चौक मध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन दि.०७-१२-२०२४ व दि.०९-१२-२०२४ रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मानवंदनेने झाली.क्रीडास्पर्धेच्या उदघाटक सौ.शिवानी सुमित कांबळे तसेच संस्थेच्या आदरणीय मान्यवरांना चिमुकल्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना दिली.
त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा.सौ.शिवानी सुमित कांबळे यांच्या शुभहस्ते क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे क्रिडांगणाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा.सौ.शिवानी सुमित कांबळे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून क्रीडांगणाचे उदघाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले .
पुढील कार्यक्रमाचा टप्पा हॉलमध्ये घेण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागताची सूचना सुलभा मॅडम यांनी केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.सौ शिवानी सुमित कांबळे यांचे स्वागत संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्यामंदिर शिशुमंदिरच्या अध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ शोभाताई देशमुख यांनी शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व बुके देऊन केले.
मा.श्री सुमित देवानंद कांबळे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.
तसेच विद्या प्रसारिणी सभा चौकचे उपाध्यक्ष मा. ऍडव्होकेट श्री. अविनाशजी देशमुख (चाचा) तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर अध्यक्षा मा.सौ.शोभाताई देशमुख (दिदी),
संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री योगेंद्रभाई शहा (भाई ) या सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
तसेच प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर चौक चे समन्वयक मा. श्री देवानंद कांबळे सर.मुख्याध्यापिका मा. सौ. सुलभा गायकवाड मॅडम
श्री.संजय कांबळे सर यांचेही स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मा. श्री देवानंद कांबळे सर यांनी करून दिला. प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर गेल्या 24 वर्षाचा आढावा सांगत खेळाचे महत्व व क्रीडा महोत्सवाचे आयोजन म्हणजेच चमचा लिंबू, रनिंग,संगीत खुर्ची व सांघिक खेळात क्रिकेट व कबड्डी खेळ घेतले जातात हे त्यांनी सांगितले तसेच प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून देताना त्यांना अभिमान वाटत होता कारण प्रमुख अतिथी ह्या श्री.देवानंद कांबळे सरांच्या सुनबाई सौ.शिवानी सुमित कांबळे ह्या होत्या परिचयामध्ये त्यांनी अतिथींच्या स्पोर्ट्स लाइफ बद्दल माहिती दिली व उत्कृष्ट हॉकीपटू आहेत तसेच खेळा बरोबरच त्यांचे दहावी पर्यन्त चे शिक्षण कॉन्व्हेन्ट स्कुल मधून झाले.तसेच अकरावी बारावी पर्यन्त चे शिक्षण वाडिया कॉलेज पुणे व इंजिनिअरिंग चे शिक्षण यम.आय.टी.कॉलेज पुणे येथे झाले.सध्या आय. टी. इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत असे त्यांनी सांगितले व अतिशय योग्य पद्धतीने प्रास्ताविक व परिचय करून दिले.
संस्थेच्या मान्यवरांनी हजारजबाबीपणा राखत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी यांना बोलण्याची संधी दिली.
प्रमुख अतिथी सौ.शिवानी सुमित कांबळे त्या स्वतःच हॉकी प्लेयर आहेत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्समन स्पिरीट जिद्द चिकाटी कशी राखावी व खेळामध्ये हार- जित असतेच त्यावर मात करून पुढे पुढे कसे जावे हे त्यांनी आपल्या अतिथीय विचारांमधून विद्यार्थ्यांना सांगितले.व आजच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्याप्रमाणे समुद्रामधील जहाजाला डायरेक्शन देण्यासाठी लाईट हाऊस असतात त्याचप्रमाणे प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर चौकला प्रॉपर गायडन्स व करेक्ट डायरेक्शन देण्याचे कार्य नेहमीच संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर च्या अध्यक्षा मा.सौ शोभाताई देशमुख (दिदी) करत असतात त्याचप्रमाणे त्यांनी सर्वांना 3म म्हणजेच मेंदू,मनगट आणि मन यांचा विकास म्हणजेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होय. तसेच खेळ असो अथवा आयुष्य या सर्वांमध्ये आपण योग्य वेळी योग्य निर्णय ,योग्य स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे जिथे ताकदीची गरज आहे तिथे ताकद वापरली पाहिजे जिथे बुद्धीचा वापर केला पाहिजे ती गोष्ट बुद्धीनेच केली पाहिजे. असे जर केले तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल अशा पद्धतीने त्यांनी आपले अध्यक्षीय विचार मांडले.
कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन श्री दिपक सरांनी केले.
आभार प्रदर्शनानंतर क्रीडा स्पर्धेच्या शपथविधीने उद्घाटन समारंभाची सांगता झाली.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सौ.शिवानी यांच्या कडून ईकलेरस चॉकलेट वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री चेतन मालुसरे सर यांनी आपल्या खास शैलीत केले.
---------