म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट प्रस्तुत"अंदाज मेरा मस्तानीच्या हिंदी बाॅलीवुड गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट प्रस्तुत"अंदाज मेरा मस्तानीच्या हिंदी बाॅलीवुड गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

       


             

प्रतिनिधि / गुरुनाथ तिरपणकर

एस् के ज्.म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट संस्थेच्या निर्मात्या व गायिका यांच्या संकल्पनेतून मुंबई,ठाणे जिल्हा अशा विविध शहरांमध्ये हिंदी-मराठी गीतांचे नृत्यमय सदाबहार कार्यक्रम आयोजित करत असतात.डोंबिवली शहरातही यापूर्वी विविध ठीकाणी म्युझिक मंत्राचे ऑर्केस्ट्रा झाले आहेत.

त्याच अनुषंगाने नुकताच म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट प्रस्तुत"अंदाज मेरा मस्ताना"हा हिंदी बाॅलीवुड गीतांचा सदाबहार कार्यक्रम सर्वेश हाॅल,टिळक चौक,डोंबिवली(पुर्व)येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या उत्कंठावर्धक कार्यक्रमात निर्माती व गायिका शर्मिला केसरकर,मणी जोस,अर्शिता पुजारी,सोनाली वाळवे,रेखा हडकर,शशि मोहीते,प्रज्ञा तांबे,संजय पटवर्धन,अतुल खरे,कैलाश माहौर,श्री.पेंडसे,धनंजय बरबडे,मंगेश पारकर,इंद्रनिल,भरत शेडगे,नितीन ठाकर,हर्षराज सुरवाडे या मात्तबर-प्रतिभावंत गायिकांच्या सुमधूर आवाजाने डोंबिवलीकर रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.काही हटके हिंदी गाण्यांवर नाचण्याचा ठेका धरला.व आनंद घेतला.

याप्रसंगी स्पे.सपोर्टर ब्रदेश नायक,साऊंड एरेंजर किशोर,म्युझिक एरेंजर तुषार बने,को-ऑडिनेटर गणेश मांजरेकर,व्हिडीओग्राफर रविंद्र टिळेकर यांनी हा ऑर्केस्ट्रा सादरीकरणासाठी विशेष बहुमोल सहकार्य लाभले.या संगितमय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कुंडु यांनी खुमासदार व उत्कृष्ट पध्दतीने केले.तसेच यावेळी ठाणे जिल्हा काँग्रेस महिला कमिटी अध्यक्षा तसेच महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशनच्या बदलापूर शहर अध्यक्षा साधाना ओव्हाळ,फॅशन डिझायनर,उद्योजिका,विविध पुरस्कार प्राप्त,विविध सामाजिक संस्थांनवर पदाधिकरी म्हणून कार्यरत असणा-या मनिषा सुर्वे,महाराष्ट्र सेवा संघ मुंबई अध्यक्ष,सचिव-वैश्यवाणी समाज मंडळ अंबरनाथ,सल्लागार-शक्ती सामाजिक संस्था ठाणे,कार्याध्यक्ष-स्वामी समर्थ प्रितिष्ठान बाळकृष्ण म्हसकर.तसेच सुर्वे हाॅस्पिलिटी सोल्युशन व जेष्ठ समाजसेवक अरविंद सुर्वे आदी मान्यवर प्रमुख  पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या सर्व प्रमुख पाहुण्यांचा निर्माती व गायिका शर्मिला केसरकर व त्यांच्या सहका-यांनी भेट वस्तु देऊन सत्कार केला.म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट प्रस्तुत"अंदाज मेरा मसाना"या ऑर्केस्ट्रातील गायक-गायिका यांनी आपल्या कंठस्वरांनी सुमधूर आवाजात हिंदी गाण्यांची मेजवानी डोंबिवलीकरांना दिली.त्यांनी शाबासकीची थाप,कौतुक व अभिनंदन केले.

---------

Popular posts
रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशन दुकानदाराविरुध्द तक्रार देण्यासाठी काय करावे !
Image
ग्रुप ग्राम पंचायत माजगांव मध्ये पुन्हा महिला राज, उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी
Image
रिलायन्स फाऊडेंशन स्कुल लाेधिवली यांना जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारूद्र नाळे यांचा आदेश - रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, लोधिवली यांनी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ व नियमावली १९८१ नुसार कार्यवाही करावी.
Image
दुय्यम निबंधक खालापुर गणेश चव्हाण यांचे हस्ते विकास इलेव्हन अॅड. टिमच लेदर बॉल किकेट प्रॅक्टीसच शुभारंभ...
Image
दिपकदादा पाटील मराठा योध्दा गौरव पुरस्काराने सन्मानित.
Image