युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने "शालेय शैक्षणिक साहित्य वाटप", "प्रथमोपचार पेटी( First Aid Kit) वाटप कार्यक्रम" मोठ्या उत्साहात संपन्न.
कुलाबा प्रभात वृतसेवा
युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, प्रथमोपचार पेटी( First Aid Kit) वाटप करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषदेच्या वडमाळवाडी, खैरासवाडी शाळेतील गरीब आणि गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना तसेच दुष्मी, ठाकूरपाडा, या शाळांमध्ये मोफत शैक्षणिक साहित्य वह्या, पेन्सिल, पेन, खोडरबर, शार्पनर इत्यादी साहित्य मुलांना वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना गोड खाऊ बिस्किटांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. वडमाळवाडी, खैरासवाडी, दुष्मी, ठाकूरपाडा, खारपाडा शाळेत तसेच खारपाडा पोलिस चेक पोस्ट येथे प्रथमोपचार पेटी( First AId Kit) वाटप करण्यात आले. तसेच वडमाळवाडी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
श्री.प्रवीण गजानन देसले यांनी स्वखर्चातून हे First Aid Kit उपलब्ध करून दिले त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाची आवड आहे परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज भागवून त्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे. शिक्षण हेच भविष्य घडविते आणि असे मदतीचे हातच समाजाला सक्षम बनवत असतात. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सुंदर सुवाच्च हस्ताक्षर पाठमाळा, सर्प जनजागृती व्याख्यानमाला,बालसंस्कार पाठमाला, योगा वर्ग, संभाषण कौशल्य, पब्लिक स्पीकिंग, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिवशंभू चरित्र व्याख्यानमाला, जपूया इतिहासाच्या पाऊलखुणा. गडकोटांच्या माहितीची पिपिटी प्रोजेक्टर साह्याने दाखविणे. एस एस सी परीक्षा विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, एस एस सी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव समारंभ असे अनेक शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवित असतो असे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात पत्रकार कैलासराजे घरत यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. मुलांनो शिका, खूप मोठे व्हा. तुमचे, आईवडिलांचे, शिक्षकांचे, गावाचे नाव रोशन करा. शिक्षकांनी सांगितलेले ऐका. तुम्ही या भारत देशाचे उद्याचे भावी नागरिक बनणार आहात. उद्या तुमच्यापैकी कोणी आयपीएस अधिकारी, पायलट, जिल्हाधिकारी, डॉक्टर,वकील इंजिनीयर बनेल फक्त एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करत जा, यश निश्चित मिळेल. शाळेत शिक्षक आपल्यावर योग्य संस्कार करत असतात. ते संस्कार विद्यार्थ्यांचा भावी काळ ठरवीत असतो.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रप्रमुख श्री.कृष्णा वर्तक सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी ट्रस्टचे आजीव सभासद श्री.ओमप्रकाश परांजपे साहेब, ट्रस्टी श्री.श्रीकांत जाधव साहेब, ट्रस्टी श्री.निलेश पारंगे साहेब, व्यवस्थापकीय संचालक श्री.प्रदीपदादा मोहिते, डी.वाय.फाउंडेशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष यश घरत साहेब. अलिबाग तालुका अध्यक्ष धीरज मालवी, ग्रूप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडाचे माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रशांत बाळकृष्ण घरत, युवा कार्यकर्ते राज दत्तात्रेय घरत,आमचे मार्गदर्शक श्री.हनुमान बाबू घरत, श्री.रत्नाकर काशीराम घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वन श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन्मानित पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी माझे परममित्र सामाजिक कार्यकर्ते दुर्गसेवक श्री.महेंश रामचंद्र शिंदे, वडमाळवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री मंगेश कांबळे सर,सौ.जानकी येवले मॅडम, अंकुर ट्रस्टचे फील्ड ऑफिसर श्री.राजेश रसाळ सर, खैरासवाडी शाळेचे शिक्षक श्री.निशांत नारायण पाटील, दुष्मी शाळेच्या शिक्षिका सौ.अनिता थवई मॅडम, श्री.मनोज तुकाराम लांगी, ठाकूरपाडा शाळेचे शिक्षक श्री.भास्कर गोपीनाथ म्हात्रे सर यांचे अनमोल सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
---------