जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने कोंडमळा येथील जि.प.पूर्व प्राथमिक आदर्श शाळेत पुस्तक पेटी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न.

 जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने कोंडमळा येथील जि.प.पूर्व प्राथमिक आदर्श शाळेत पुस्तक पेटी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न.     

चिपळूण / गुरुनाथ तिरपणकर

पाठ्यपुस्तका व्यतिरीक्त विविध प्रकाशनची उपयुक्त वाचनिय पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जनजागृती सेवा संस्थेने मु.कोंडमळा,ता.चिपळूण येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक आदर्श शाळेला४००पुस्तके भेट देण्यात आली.नुकताच हा पुस्तक पेटी प्रदान सोहळा जि.प.पूर्व प्राथमिक आदर्श शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद घाणेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक, समाजसेवक-संस्थेचे जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे, मुख्याध्यापक संतोष कदम, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

सर्व प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर सर्वांग सुंदर समुह नृत्य करुन सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.मुख्याध्यापक संतोष कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या पुस्तक भेट उपक्रमाचे कौतुक केले.

त्यांच्या शालेय‌अंतर्गत या उपक्रमाचा फायदा होणार आहे.प्रमुख पाहुणे संस्थेचे जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे यांनी आपल्या मनोगतात आपण या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत याचा अभिमानाने उल्लेख केला व शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद घाणेकर यांनी यांनी पुस्तक पेटी प्रदान सोहळ्याचे कौतुक केले व मुलांना शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण करुन मुलांना व्याख्यान्याच्या माध्यमातून संस्थेने मार्गदर्शन व सहकार्य करावे असे सुचित केले,त्यांची ही मागणी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी मान्य केली आहे.संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर आणि सहकारी यांनी संपूर्ण शाळेची पहाणी केली, 

स्वच्छता, उत्कृष्ट रंग रांगोळीच्या माध्यमातून केलेली कलाकुसर व कलाकृती, भिंतीवरील रेखाटलेली ज्ञानात भर घालणारी स्लोगन, संगणक रुम, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तयार केलेला वाचन कट्टा,मुलांनी सादर केलेली प्रात्यक्षिके हे सर्व पाहून ही शाळा उच्चतम शिखरावर आहे याची जाणीव झाली.अचानक शाळेला भेट देणाऱ्या उप शिक्षणाधिकारी मॅडम यांनी पुस्तक पेटी प्रदान सोहळ्याचे संस्थेचे कौतुक व अभिनंदन केले.

हा कार्यक्रम संस्थेचे जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे यांनी पुढाकार घेऊन विशेष मेहनत घेऊन यशस्वी केला.याप्रसंगी शाळेतील शिक्षकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे शैक्षणिक सन्मानपत्र प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले.या उपक्रमासाठी विजय धनावडे, रविंद्र कुलकर्णी,रुपेश सोमण, प्रदीप पाटील,शरद खानविलकर, प्रदीप नेवे, रमेश जुईकर यांचे विशेष सहकार्य लाभले

---------