सौ. गुलाब किसन सांगळे यांचे दुःखद निधन.

 सौ. गुलाब किसन सांगळे यांचे दुःखद निधन.


कुलाबा प्रभात वृत्तसेवा

लोधिवली येथील सौ. गुलाब किसन सांगळे यांचे गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगळे कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सौ. गुलाब सांगळे या स्वभावाने अत्यंत सौम्य, शांत, मनमिळावू, कुटुंबवत्सल व सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या होत्या. नातेसंबंध जपणाऱ्या, समाजाशी जोडून राहणाऱ्या त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करून गेल्या. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांनी आपला एक मजबूत आधार गमावला असून नातेवाईक, मित्रपरिवार व गावकऱ्यांमध्ये शोकाची लाट पसरली आहे.

त्यांची अंतिम इच्छा जन्मगावीच अंत्यविधी व्हावा अशी होती. त्यांच्या या शेवटच्या इच्छेप्रमाणे अत्यंत शोकाकुल वातावरणात कर्जत साळोख येथील जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिसऱ्या दिवशी राख धुवण्याच्या दिवशी, सौ. गुलाब किसन सांगळे यांचे स्मरण सदैव राहावे या उद्देशाने साळोख ग्रामस्थांच्या वतीने वैकुंठधाम स्मशानभूमी परिसरात जांभूळ व इतर फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांना संरक्षण कुंपण घालून त्यांची नियमित निगा राखण्यात येणार असून, लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. या उपक्रमात चंद्रकांत तात्याजी कडू, बाळकृष्ण मोरे, गणेश मोरे, हत्तात्रेय धोंडू मोरे यांच्यासह समस्त साळोख ग्रामस्थांचा सहभाग होता.

                       दशक्रिया विधी

शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता

श्री क्षेत्र धाकटी पंढरी, साजगाव येथे होणार आहे.

                       ् उत्तरकार्य

मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी

साळोख तर्फे नीड येथे पार पडणार आहे.

---------