खेड्यातील कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर, पावसळ्यापुर्वी घराची दुरुस्ती करण्यांची लगबग !

खेड्यातील कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर, पावसळ्यापुर्वी घराची दुरुस्ती करण्यांची लगबग !



 


प्रतिनिधी  / काशिनाथ जाधव 


      
पावसाचे आगमन होण्याच्या आधी खेडेगावात वेध लागायचे ते आपले घरावरती असलेले छपर व्यवस्थित करण्याचे या साठी प्रत्येकाची धडपड सुरु असायची  ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे असल्यामुळे ती कौल सारखी करण्यासाठी प्रत्येकाची लगबग असायची परंतू बदलत्या काळात कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने .प्रत्येक व्यक्ती घर बांधताना कौल न वापरता सिमेंटच्या पत्राचा उपयोग करीत आहे.यामुळे मातीची कौल इतिहास जमा होत चालली आहे.


आजही शहरासह खेडेगावही बदलत चालले आहे. सिमेंटच्या जंगलांनी घरे व्यापली जात आहेत. खेड्यातील कौलारू घरासह इतरही अनेक बदल होताना आज आपणस पहावयास मिळत आहे.दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधीच कौलारू घरांची डागडूगी करणे गरजेचे असे यालाच घर फेरणे असे म्हणतात.
आज घर फेरणारे कारागीरही दुर्मिळ झाले आहे. कौलारू घर उन्हाळ्यातही गरम होत नाही.यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असायची मातीची कौल ही उन्हाचा जाळ स्वत: शोषूण ते आपल्या शरीरापर्यंत नैसर्गिक गारवा पोहचवत असते. ए.सी. किंवा कुलरची हवा नैसर्गिक नसल्याने एका मर्यादेनंतर त्यांचे दुष्परिणाम शरीरावर निश्‍चितच होताणा आपणास पहावयास मिळत आहे.
पण कौलारू घरे उन्हाळ्यात माणसाचे आरोग्य नीट सांभाळून ठेऊन उन्हाळा सुहह्य करत असते.आजही खेड्यात चार दोन घरे कौलारू दिसतात मात्र नवीन घर निर्मितीच कौलारू घरे बंद होत असल्याने हळू हळू अस्तित्वात असणारी कौलारू घरेही नामषेश होत चालली आहे हे मात्र निश्चित.


================================


कुलाबा प्रभात नवलेखा पेज वाचकांसाठी खास माहिती ,या माहिती नुसार नियमित वाचा कुलाबा प्रभात नवलेखा पेज.


 

जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभात नवलेखा पेजच्या इतर न्युज वाचण्यासाठी, आपल्या मोबाईल मध्ये कुलाबा प्रभात नवलेखाची असलेली कोणतीही  न्युज लिंक ओपण केल्यानंतर All, ब्रेकिंग,राजकीय  च्या वरती रेड कल्लर मध्ये दिसत असलेल्या कुलाबा प्रभातरव टच केल्यावर जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभातच्या इतर न्युज आपण वाचू शकता.

 

वाचकांसाठी ही खास सुविधा फक्त आणी फक्त कुलाबा प्रभात नवलेखा पेज वरच.

 

===============================

 

कुलाबा प्रभात साठी - चौक,कलोते, खालापूर,खोपोली,सावरोली,लोहोप,वाशिवली,कैरे,कासप,चावणे,पनवेल,

पोयंजे,अजिवली,सावळे,पलस्पे, सोमाटणे,रसायनी,गुलसुंदे,आपटा,दांडफाटा,रिस आदी विभागात प्रतिनिधी नेमणे आहे,तरी दहावी उत्तीर्ण व लिखाणाची आवड असणाऱ्यांनी संपर्कं साधावा.

 

कुलाबा प्रभात - संपादक अमोल सांगळे,

उपसंपादक वैभव पाटील,

कुलाबा प्रभात मार्गदर्शक - राकेश खराडे

 

===============================