धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळी सुधारणार
मुंबई / पी.व्ही.आनंद
धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळीत समतोल आणण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम ५ पोट - कलम (2अ) मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिनियमातील दुरुस्तीबाबतचे विधेयक विधानमंडळास सादर करण्यात येईल.
यापूर्वी सेवा प्रवेश नियम करत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्यामुळे या अधिनियमात पुनश्च सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निम्न पदावरुन पदोन्नतीने किंवा नामनिर्देशनाने नियूक्ती करताना सर्वसाधारणपणे ५०:५० हे सेवाभरतीचे प्रमाण विहीत करण्यासंबंधी सुचना दिल्या आहेत. धर्मादाय संघटनेतील सहायक धर्मादाय आयुक्त या पदावर (४१ जागा) पदोन्नतीने निम्न संवर्गातील (अधिक्षक, जनसंपर्क अधिकारी, प्रशासकीय अधिकारी) अशी एकुण १३५ मंजुर पदे आहेत. तथापि, या सुधारणेत सहायक धर्मादाय आयुक्त या पदावर पदोन्नतीने निम्न संवर्गातुन (अधिक्षक) पदे भरण्याची तरतुद केली नसल्याने धर्मादाय संघटनेतील सर्व निम्न संवर्गातील पदांच्या पदोन्नती साखळीतील समतोल राखता येणे शक्य होणार नाही. तसेच धर्मादाय संघटनेत अधिक्षक संवर्गात ९९ मंजुर पदांपैकी ३९ पदे ही सरळसेवेने भरण्यात आलेली आहेत.
त्यामुळे निम्न संवर्गातुन सहायक धर्मादाय आयुक्त पदावर पदोन्नतीची पदे उपलब्ध असतानादेखील पदोन्नतीच्या तरतुदीअभावी एकाच संवर्गात संबंधित अधिक्षक / प्रशासकीय अधिकारी यांना सेवानिवृत्त होईपर्यत त्याच पदाचे कामकाज पहावे लागेल. त्यामुळे त्यांचेमध्ये नैराश्य येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अधिक्षक / जनसंपर्क अधिकारी या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या जागेवर निम्न संवर्गातुन (निरिक्षक/न्याय लिपिक) पदोन्नतीसाठी पदे उपलब्ध होत असल्याने सर्व संवर्गातील निम्न श्रेणीतील पदोन्नतीच्या प्रक्रियेत अडथळा न येता ती सुरळीतपणे होऊ शकेल व पदोन्नती साखळीमध्ये त्रिमीती (pyramid) राखणे सुयोग्य होईल.
=======================
कुलाबा प्रभात नवलेखा पेज वाचकांसाठी खास माहिती ,या माहिती नुसार नियमित वाचा कुलाबा प्रभात नवलेखा पेज.
जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभात नवलेखा पेजच्या इतर न्युज वाचण्यासाठी, आपल्या मोबाईल मध्ये कुलाबा प्रभात नवलेखाची असलेली कोणतीही न्युज लिंक ओपण केल्यानंतर All, ब्रेकिंग,राजकीय च्या वरती दिसत असलेल्या कुलाबा प्रभातरव टच केल्यावर जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभातच्या इतर न्युज आपण वाचू शकता.
वाचकांसाठी ही खास सुविधा फक्त आणी फक्त कुलाबा प्रभात नवलेखा पेज वरच.
========================
कुलाबा प्रभात मार्गदर्शक - राकेश खराडे
कुलाबा प्रभात संपादक - अमोल सांगळे
कुलाबा प्रभात उपसंपादक - वैभव पाटील
=========================