कष्टाने मिळवलेले आरक्षण सोडणार नाही-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन
कष्टाने मिळवलेले आरक्षण सोडणार नाही-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन


 


चौक / अर्जुन  कदम 

 

अत्यंत कष्टाने मिळविलेले आरक्षण हे राज्य सरकार मा.सर्वोच्च न्यायालयात टिकउ शकले नाही,याचा संताप सकळ मराठा समाजात आहे,याची झळ राज्य सरकारला लागेल,त्यामुळे एकही दिवस आरक्षणापासून वंचित ठेऊ नये,आशा मागणीचे निवेदन तहसीलदार खालापूर यांना देण्यात आले.
,मा.सर्वोच्च न्यायालयाने SEBC मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठा कडे सुपूर्द करताना मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे,हे आरक्षण खंड न पडता सुरू रहाण्यासाठी राज्य सरकारने घटनातज्ञ व कायदेविषयक तज्ञ यांच्या सल्ल्यानुसार तातडीने प्रयत्न करावे यासाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते,खालापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने राज्य समन्वयक सुनील पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देण्यासाठी खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांना दिले.कोपर्डी प्रकरणात मा.उच्च न्यायालयात खटला सुरू असून त्याला गती देण्याचे काम सरकारने करून आरोपींना फाशी देण्यात यावी,तर रायगड जिल्ह्यातील तांबडी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.राज्य सरकारने घोषित केलेली पोलीस भरतीला स्थगिती द्यावी,मा.मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नती आरक्षणबाबत रिटपिटीशन २७९७/२०१५ याला ऑगस्ट २०१७ मध्ये दिलेल्या निर्णयास मा.सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही त्यामुळे मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे.मा.सर्वोच्चन्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी शैक्षणिक प्रवेशाचे टप्पे पूर्ण झाले आहेत,त्यांच्या शैक्षणिक काळात खंड पडू नये. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याला कर्ज प्रकरणासाठी आर्थिक तरतूद बजेट मध्ये करावी,मराठा आंदोलनातील केसेस मागे घ्याव्यात,मराठा-कुणबी समाज्याच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मागत आहे. तामिळनाडू सरकारने सरकारी शाळेत शिक्षण घेतलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ७.५% जागा वाढउन दिल्या आहेत,तसा निर्णय घेण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे.दहा मुद्द्यांच निवेदन देण्यात आले. जमलेला सकळ मराठा समाजाने शासकीय नियमांचे पालन करून मोर्चा काढला.विठ्ठल मोरे,राजेश पाटील,अमित यादव,मारुती खाणे,अविनाश तावडे,मनीष यादव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


=======================


कुलाबा प्रभात नवलेखा पेज वाचकांसाठी खास माहिती ,या माहिती नुसार नियमित वाचा कुलाबा प्रभात नवलेखा पेज.


जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभात नवलेखा पेजच्या इतर न्युज वाचण्यासाठी, आपल्या मोबाईल मध्ये कुलाबा प्रभात नवलेखाची असलेली कोणतीही  न्युज लिंक ओपण केल्यानंतर All, ब्रेकिंग,राजकीय  च्या वरती दिसत असलेल्या कुलाबा प्रभातरव टच केल्यावर जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभातच्या इतर न्युज आपण वाचू शकता.

 

वाचकांसाठी ही खास सुविधा फक्त आणी फक्त कुलाबा प्रभात नवलेखा पेज वरच.

 

========================

 

कुलाबा प्रभात मार्गदर्शक - राकेश खराडे

कुलाबा प्रभात  संपादक - अमोल सांगळे

कुलाबा प्रभात उपसंपादक - वैभव पाटील

 

=========================