स्वर्गीय कोठुजी कुंभारे वसतीगृहाचे इचलकरंजीत उद्घाटन

स्वर्गीय कोठुजी कुंभारे वसतीगृहाचे इचलकरंजीत उद्घाटन.


प्रतिनिधी / गुरुनाथ तिरपणकर

             मुंबईतील दानशूर समाज बांधव कै . कोठूजी कुंभारे यांच्या स्मृती चिरंतर ठेवण्याच्या उद्देशाने बांधलेल्या कै. कोठूजी कुंभारे वसतीगृहाचे उद्घाटन हम्पी येथील गायत्री पिठाचे अधिपती श्री श्री श्री दयानंद पुरी महास्वामीजी यांच्या शुभहस्ते, व महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते व मॅनिंजिंग ट्रस्टी अंकुशराव उकार्डे यांचे प्रमुख उपस्थित दिमाखदारपणे संपन्न झाले महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाने केलेल्या आर्थिक मदतीने व श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांनी या वसतिगृहाचे बांधकाम केले आहे. 

         याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्वामीजींनी कोष्टी समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा प्रसार, आर्थिक प्रगती व समाजाची एकता होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. प्रारंभी देवांग समाज अध्यक्ष श्री विश्वनाथ मुसळे व त्यांच्या पत्नी  सौ विद्याताई यांच्या हस्ते त्यांची पाद्यपूजा करण्यात आली. स्वामीजींचा सत्कार महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते व अंकुशराव उकार्डे यांचे हस्ते व कोष्टी फेडरेशनचे अध्यक्ष श्री अरुणराव वरोडे यांच्या उपस्थित संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक देवांग समाजाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ मुसळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पंडित ढवळे यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन श्री राजेंद्र सांगले यांनी केले. याप्रसंगी देवांग समाजाच्या चौंडेश्वरी गृहनिर्माण, महिला मंडळ, महिला पतसंस्था, युवा संघटना इत्यादी विविध संस्थांच्या वतीने स्वामीजींचा सत्कार करण्यात आला.

        या उद्घाटन प्रसंगी,निमंत्रित ट्रस्टी,श्री राजेंद्र ढवळे, उपाध्यक्ष उदयराव बुगड,सल्लागार विश्वनाथ मुसळे,श्री विठ्ठलराव डाके,महासचिव रामचंद्र निमणकर,सचिव मिलिंद कांबळे उदयराव बुगड,महिला कार्याध्यक्ष सौ स्मिता सातपुते,तसेच सौ स्मिता बगड,सौ संगीता धूत्रे ,श्रीमती प्रीती बुगड,सौ दीपा सातपुते,श्रीमती सुशीला फाटक,सौ उज्वला कबाडे,सौ.रूपा बुगड तसेच दिलीप भंडारे ,शितल सातपुते विलास पाडळे,डी,एम कस्तुरे ,राजेंद्र चांगले,प्रमोद मुसळे,कुमार कबाडे मधुकर वरुटे ,आनंदा साखरे, उत्तम म्हेत्रे, जयेश बुगड राहूल सातपुते दयानंद लिपारे  महेश ढवळे इत्यादी मान्यवर तसेच समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ---------

Popular posts
रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशन दुकानदाराविरुध्द तक्रार देण्यासाठी काय करावे !
Image
ग्रुप ग्राम पंचायत माजगांव मध्ये पुन्हा महिला राज, उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी
Image
रिलायन्स फाऊडेंशन स्कुल लाेधिवली यांना जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारूद्र नाळे यांचा आदेश - रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, लोधिवली यांनी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ व नियमावली १९८१ नुसार कार्यवाही करावी.
Image
दुय्यम निबंधक खालापुर गणेश चव्हाण यांचे हस्ते विकास इलेव्हन अॅड. टिमच लेदर बॉल किकेट प्रॅक्टीसच शुभारंभ...
Image
दिपकदादा पाटील मराठा योध्दा गौरव पुरस्काराने सन्मानित.
Image