ऑक्टोबर, तालुक्यातील भात कापणी लगबग सुरु असून अल्प भुधारक यांची कामे अंतिम टप्प्यात आली असून काही शेतक-यांची शेतीची कामे पूर्ण करण्यास लगभग सुरु झाली आहे.या वर्षी वरून राजाने शेतक-यावर अभिषेक उत्तम केला मात्र ,परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वाया गेल्यामुळे हातामध्ये हवे तेवढे धान्य मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून गेल्या पंधरा दिवसांपासून शेतक-यांनी भात कापणी सुरु केली आहे.चार महिने अथांग परिश्रम घेऊन शेतकर-याला आता भाताचा दाना पहावयास मिळाला आहे.
यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे. या वर्षी शेतीला उत्तम पिक आले.असून मात्र परतीच्या पावसाने भूईसपाट केले आहे. यामुळे शेतक-यांनी हे आलेले पिक कापून घेत आहे. शेतक-यांनी भात शेती कापणीला सुरवात केली असून,काही शेतक-यांनी शेतामध्ये भात झोडणी ही चालू केली आहे.सूर्याच्या उत्तम प्रकाशाने कापलेली भात शेतामध्ये सुकून,शेतामध्ये झोडणी शेतक-यांनी चालू केली. कापलेलेल्या भात - कडपा वर पाऊस पडल्याने ते कुजून गेली होती.यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता.शेतक-याकडे असणारे गुरे,वासरे यांना पेंढा,चारा मिळणार नाही.याची चिंता जणू शेतक-याला लागली होती.परंतू अजून काही भागात शेत कापणी ची कामे खोळंबली आहे.
तर काही अल्प शेतक-यांनी भात कापणी पूर्ण झाली आहे.तर काही शेतकर-यांची लगभग सुरु झाली आहे. काही ठिकाणी शेतीचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले दिसत आहे.तरी सुद्धा शेतकरी मोठ्या जिद्दीने उभा राहिला आहे. तालुक्यातील शेतक-यांची भात कापणी अंतिम टप्पयात आली असून दोन -तीन दिवसात शेतीची कामे पूर्ण होतील असे मत प्रतिनिधी बोलताना व्यक्त केले.
=======================
कुलाबा प्रभात नवलेखा पेज वाचकांसाठी खास माहिती ,या माहिती नुसार नियमित वाचा कुलाबा प्रभात नवलेखा पेज.