जीवनात शीलवान बनायचे असेल तर पंचशील तत्व आचरणात आणा-भन्ते शिवली बोधी
रसायनी / राकेश खराडे
जीवनात मनुष्य जीवनाचा आनंद घेण्यासाठी बोधिसत्व भगवान गौतमबुद्ध यांनी सांगितलेल्या पंचशील या तत्वांचा अंगीकार करा,असे विनम्र आवाहन भन्ते शिवली बोधी यांनी केले आहे.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा खालापूर व नवतरूण मित्र मंडळ चौक यांच्या विद्यमाने बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिरार्थी यांना फळआहार कार्यक्रम चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक-सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी भन्ते शिवली बोधी बोलत होते.बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन रसायनी मोहपाडा येथे सुरू असून राज्यभरातून तेथे ४७ प्रशिक्षणार्थी शिक्षण घेत आहेत.
जीवाची हिंसा करणार नाही व हत्या करण्यापासून मला व इतरांना परावृत्त करीन,मी चोरी करणार नाही,त्यासाठी अलिप्त राहीन,मी व्यभिचार करणार नाही,मी खोटे बोलनार नाही,मद्यपान करणार नाही व मादक वस्तूंचा मोहात पडणार नाही,व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवीण हे पाच शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनेल असे एम.डी.सरोदे राष्ट्रीय सचिव व हरियाणा,राजस्थान प्रभारी यांनी सांगितले.अंधश्रद्धा निर्मूलन,शिक्षण,जीवन आदीबाबत माहिती दिली जात आहे.यावेली शिवली बोधी यांच्यावतीने भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस सरोदे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
विजय कांबळे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष,संपदाताई चव्हाण,अध्यक्ष रायगड, अॕडव्होकेट मिलिंद गायकवाड,पनवेल तालुकाध्यक्ष राम जाधव, खालापूर तालुका अध्यक्ष शंकर गायकवाड,प्रतिभाताई गायकवाड, योगेश पवार, चंद्रकांत पवार, ऋषिकेश धनगावकर, मयुर धनगावकर,प्रभाकर धनगावकर,आनंद गायकवाड,राम पवार, गोविंद पवार, प्रविण धनगावकर, गणेश जाधव, जगदीश गायकवाड, संतोष डोंगरे,जिवन जाधव, संतोष पवार, रोहित पवार,संगराज बाविस्कर, सिध्दार्थ सटाणे, राजेंद्र सटाणे, संदिप जाधव, भगवान बाबरे यांच्यासह अनेक बोधिसत्वचे अनुयायी व ग्रामस्थ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.यासाठी नवतरुण बुध्द मित्र मंडळ चौक आणि रमाबाई महिला मंडळ चौक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
=====================
जाहिरात...
=======================
नियमित वाचा कुलाबा प्रभात नवलेखा पेज
महाराष्ट्रातील जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभात नवलेखा पेजच्या इतर न्युज वाचण्यासाठी, आपल्या मोबाईल मध्ये कुलाबा प्रभात नवलेखाची असलेली कोणतीही न्युज लिंक ओपण केल्यानंतर All, ब्रेकिंग,राजकीय च्या वरती दिसत असलेल्या कुलाबा प्रभातरव टच केल्यावर जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभातच्या इतर न्युज आपण वाचू शकता.
=======================



