रुग्ण मित्र स्नेह संवाद ३.० सहयोगी संस्थांच्या पुढाकाराने थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रसोबतच अवयवदानाचा प्रचार, प्रसार व प्रबोधन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद.
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
रुग्ण मित्र स्नेह संवाद ३.० सहयोगी संस्थांच्या पुढाकाराने थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रसोबतच अवयवदानाचा प्रचार, प्रसार व प्रबोधन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय सायन येथे शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र मार्गदर्शनपर जागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली,रुग्ण मित्र सामाजिक कार्यकर्ता विनोद साडविलकर व सहयोगी संस्थांमार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने करण्यात आली.डाॅ.राधा गडीयाल खाते प्रमुख बालरोग विभाग यांच्या हस्ते करण्यात आले.दिवंगत रुग्ण मित्र साथी, नातेवाईक यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.कार्यशाळेसाठी डाॅ.मोहन जोशी अधिष्ठाता यांनी थॅलेसेमिया आजाराचे प्रबोधनात्मक महत्वाच्या बाबी विषद केल्या.डाॅ.सुजाता शर्मा प्राध्यापक बालरोग, रक्तदोष व कर्करोग यांनी थॅलेसेमिया आजार व रक्त संक्रमण,डाॅ.पूर्वी कडाकिया(कुट्टी),डाॅ.रादनी मांडे यांनी थॅलेसेमिया आजाराचे इतर दुष्परिणाम,डाॅ.पूर्वा राणे-सुर्वे यांनी थॅलेसेमिया पूर्व तपासणी व समुपदेशन याचे दृकश्राव्य माध्यमातून महत्वपूर्ण माहिती दिली.विद्याधर गांगुर्डे,विनय शेट्टी व गजानन नार्वेकर यांनी थॅलेसेमिया निर्मूलन सामाजिक जागरूकता व व्यक्तीश: तपासणीचे आग्रही भूमिका स्पष्ट केली.
रुग्णालयीन नर्सिंग स्टाफ व अधिकारी कर्मचारी,मुंबईतील वस्ती पातळीवर काम करणा-या विविध रुग्ण मित्र साथी सामाजिक संस्था प्रतिनिधी गणेश पवार, रमेश चव्हाण,जय साटेलकर,श्रुती साडविलकर,अमोल सावंत,सचिन राणे,श्वेता सावंत,कमलेश साळकर, श्रध्दा अष्टीवकर,प्रफुल्ल नवार,धनंजय पवार,गौतम पाईकराव,बाबू बतेली, रत्नाकर शेट्टी,रियाज मुल्ला,सुभाष गायकवाड, ज्योती जोशी,तनिष्का जोशी,श्रद्धा बनसोडे,श्रेया सप्रे,विद्या केदारे,प्रज्ञा कुचेकर,किरण साळवे,किरण गिरकर,पंकज नाईक, जितेंद्र लोके,प्रशांत म्हात्रे,गणेश आमडोसकर, रहेना शेख,संजय गांगुर्डे, डॉ.छाया भटनागर, अरविंद पारकर,आनंद सरतापे,जयकिशन डुलगच,सुमित वडगावकर,विरेंद्र जोईल,संदीप पाटील, शांताराम मोरे व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.मान्यवरांचा रुग्ण मित्र सन्मान चिन्ह,तुळशी रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.
सुत्रसंचालन निरंजन आहेर यांनी केले.रुग्णालय व्यवस्थापनाकडून डाॅ.अमित फादीया, डॉ.प्रकाश गायकवाड,नेहा संख्ये,प्रेरणा नांदगावकर,अनिता हांडेउर्मिला महाजन,संगीता जोशी व तरुण युवक मंडळाच्या भारतीबेन संगोई,रोटरी भांडुप मुंबईच्या सीमा क्षीरसागर यांच्या सहकार्याने कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.विनोद साडविलकर यांनी सर्व उपस्थित व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतगारांचे कृतज्ञता पूर्वक आभार मानले.
.---------

