महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खालापूर तालूका अध्यक्ष पदी राहुल जाधव तर उपाध्यक्ष पदी अर्जुन कदम


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खालापूर तालूका अध्यक्ष पदी राहुल जाधव तर उपाध्यक्ष पदी अर्जुन कदम 



कुलाबा प्रभात वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खालापूर तालूका अध्यक्ष पदी राहुल चंद्रकांत जाधव यांची तर उपाध्यक्ष पदी अर्जुन बळीराम कदम यांची नुकतीच निवड करण्यात आली.

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि लोकशाही बळकटीकरणासाठी लढाणारी एकमेव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना असून या पत्रकार संघटनेच्यावतीने 28 जुलै पासून दिक्षा भूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय 20 आॅगस्ट अशी पत्रकारांची संवाद यात्रा सुरु आहे.

संघटनेची  खालापूर तालूक्याची कार्यकारिणी जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली.

 यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खालापूर तालूका अध्यक्ष शपदी राहुल चंद्रकांत जाधव, उपाध्यक्षपदी अर्जुन बळीराम कदम, सल्लागारपदी दिनकर भुजबळ,खजिनदारपदी अमोल सांगळे, संपर्क प्रमुख दिनेश पाटील, सहसचिव प्रसाद अटक, विशाल वाघमारे, सदस्यपदी दत्तात्रय शेडगे, जितेंद्र भोईर, शाबीर शेख, गौतम सोनावणे,विश्वनाथ गायकवाड, पंढरीनाथ कुरंगले, देवा पवार, प्रतीक चाळके, निनाद चोपडेकर,मिलिंद पाटील आदींची निवड करण्यात आली.

 नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्याहस्ते नियुक्ती पत्रक देऊन शाल आणि पुष्पगुछ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


 ---------