कांची कामकोटी पिठाचे 71 वे उत्तराधिकारी म्हणून सत्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांचा अभिषेक.
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
कांचीपुरमः वैदिक मंत्रोच्चार आणि हर हर शंकरा, जय जय शंकरा च्या गजरात, श्री सत्म चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांना बुधवार, अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, कांची कामकोटी पिठाचे 71 वे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
श्री विजयेंद्र सरस्वती शंकराचार्य, जे सध्याचे आचार्य आहेत, यांनी त्यांचे उत्तराधिकारी, ज्यांचे जन्म नाव दुड्डू सत्म व्यंकट सूर्य सुब्रमण्य गणेश शर्मा द्रविड आहे, यांना संन्मास दीक्षा समारोहाद्वारे आचार्य म्हणून दीक्षा दिली आणि कांची कामक्षी अम्बल देवस्थान मंदिरातील गंगा तीर्थ येथे दंड सोपवला.
या पवित्र प्रसंगी बोलताना, श्री विजयेंद्र सरस्मृती म्हणाले की श्री सत्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे कांची कामकोटी पीठ कुटुंबात सामील झाले आहेत, जे गुरु परंपरेची प्रथा पुढे नेण्यासाठी देशातील सर्वात महत्वाच्या पिठांपैकी एक आहे.
नियुक्ती समारंभानंतर, रस्पाच्या दोन्ही बाजूला भाविकांनी दोन्ही आचार्यांचे जोरदार स्वागत केले. कांची मठातील एका सूत्राने सांगितले की नवीन आचार्य हे आंध्र प्रदेशातील अन्नवरम येथील वैदिक विद्वानांच्या एका सामान्य कुटुंबातील आहेत. 20 वर्षीय नवीन आचार्य हे स्मृतः ऋग्बेदाचे विद्वान आहेत. त्यांनी 12 वर्षांहून अधिक काळ वैदिक शिक्षण घेतले आहे आणि ते तेलंगणातील बासर येथील श्री ज्ञान सरस्वती देवस्थानम येथे पंडित म्हणून कार्यरत होते.
त्यांचे वडील धन्ब्रंतरी शर्मा हे आंध्र प्रदेशातील अन्नवरम येथील श्री सत्यनारायण मंदिरामध्ये पुजारी आहेत तर त्यांची आई अलमेलू गृहिणी आहेत आणि त्यांची धाकटी बहीण पदवीचे शिक्षण घेत आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी अभिषेक सोहळ्यात भाग घेतला होता.
---------