उरण मधील शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी .
उरण / विठ्ठल ममताबादे
३० एप्रिल २०२५ रोजी उरण तालुक्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, नगर परिषद आदी शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. उरण नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी तथा प्रशासक समीर जाधव यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक प्रशासन अधिकारी मिलिंद धाटावकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जितेंद्र चिर्लेकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उरण तहसील कार्यालयात तहसीलदार उद्धव कदम यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. उरण मधील या महत्वाच्या शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचे, विचारांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यामुळे उरण तालुक्यात सर्वत्र महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात येऊ लागली.
महात्मा बसवेश्वर जयंती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी वर्गांचे आभार मानत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
---------