गायन क्षेत्रातील उगवती तेजस्वी चांदणी ईश्वरी लोहोटे,कला भूषण पुरस्काराने सन्मानित...!
प्रतिनिधी / गुरुनाथ तिरपणकर
बालवयातच कलात्मक धोरण अवलंबुन नृत्य,सामाजिक बांधिलकी,गायन तसेच सांस्कृतिक क्षेत्रात आपले नाव उज्वल करणारी मुलगी म्हणजे ईश्वरी लोहोटे. कलागुण संपन्न,गोड गळ्याची गायिका,सामाजिक क्षेत्रात अग्रेसर, नृत्य, शिक्षणात हुशार विविध क्षेत्रात आपल्या गुरुजनांचे व आईवडीलांचे नाव अजरामर करणारी इयत्ता सातवी मध्ये शिकणारी मुलगी ईश्वरी लोहोटे. तीच्या या चतुरस्त्र कामगिरीची दखल मुंबईच्या आर्यारवी एंटरटेन्टमेन्ट या संस्थेने घेतली.
नुकताच शिशुविकास हाॅल,राजकमल स्टुडिओ,परेल येथे आर्यारवी एंटरटेन्टमेन्टने आयोजित केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्यात ईश्वर लोहोटे हिला"कला भूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते जयराज नायर, प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते, दिग्दर्शक प्रदीप कबरे, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, समाजसेविका सीमाताई पाटील, ग्राफीक डिझायनर मनिष व्हटकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
ईश्वरी लोहोटे हिने गायन क्षेत्रातील विविध टप्यातील परीक्षा देऊन प्राविण्य मिळविलेले आहे.नाट्य,सामाजिक क्षेत्र, नृत्य, गायन, शिक्षण या क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे पुरस्कार, सन्मानपत्र, प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.तसेच प्रसिद्ध सिने-नाट्य, लेखक-दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या कार्यशाळेत शिक्षण घेत आहे.ईश्वरी लोहोटे हिला"कला भूषण"पुरस्कार मिळाल्याबद्दल तीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
---------