उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश,अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड.

उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश,अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड.                                          


कुलाबा प्रभात वृत्तसेवा

बदलापूर-उल्हास नदीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत भराव,संरक्षण भिंतीचे बांधकाम व नदीपात्रातील अतिक्रमण प्रकरणी उल्हास नदी बचाव समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

हेंद्रेपाडा येथील सत्संग विहार समितीने नदीपात्रातात अनधिकृतपणे भराव टाकण्याचे आणि संरक्षक भिंतीचे काम सुरु  केले होते.

या अतिक्रमणाची माहिती मिळताच उल्हास नदी बचाव समितीने महसूल,पोलिस आणि कुळगांव-बदलापूर नगरपरिषद प्रशासनासह संबधित अधिका-यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत कृती करत प्रशासनाने संबंधित काम थांबविले आणि आणि वापरात असलेल्या जेसीबी,पोकलेन मशिनरी सील केली होती.याप्रकरणी तहसीलदार मा.अमित पुरी यांनी ठोस कार्यवाही करत सत्संग विहार समितीवर १० कोटी १६ लाख १७ हजार १४१रुपयांचा दंड ठोठावला आहे.

त्यांच्या या निर्णयाचे उल्हास नदी बचाव समितीने प्रशासनाचे मनःपूर्वक कौतुक करत मनस्वी आभार मानले आहेत.तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीया,प्रिंट मिडीया,युट्युब चॅनल व सर्व पत्रकार बंधु-भगिनी यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही उल्हास नदी बचाव समितीच्या वतीने धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात आले.

---------

Popular posts
रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशन दुकानदाराविरुध्द तक्रार देण्यासाठी काय करावे !
Image
ग्रुप ग्राम पंचायत माजगांव मध्ये पुन्हा महिला राज, उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी
Image
रिलायन्स फाऊडेंशन स्कुल लाेधिवली यांना जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारूद्र नाळे यांचा आदेश - रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, लोधिवली यांनी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ व नियमावली १९८१ नुसार कार्यवाही करावी.
Image
दुय्यम निबंधक खालापुर गणेश चव्हाण यांचे हस्ते विकास इलेव्हन अॅड. टिमच लेदर बॉल किकेट प्रॅक्टीसच शुभारंभ...
Image
दिपकदादा पाटील मराठा योध्दा गौरव पुरस्काराने सन्मानित.
Image