"उद्योगऊर्जा" "नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स" या पुरस्काराने सन्मानित !
प्रतिनिधी / गुरुनाथ तिरपणकर
आर्मी कन्या अंजली साखरे आणि संतोष साखरे संचालित AS Valiant Fame Icon Foundation या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने, "उद्योगऊर्जा" या संस्थेचा नुकताच "नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स" देऊन गौरव करण्यात आला. MSME उद्योजकांच्या विकासासाठी आणि नेटवर्किंगचे भक्कम व्यासपीठ उभे करण्यासाठी गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ केलेल्या समर्पित समर्पित कार्याचा हा यथोचित सन्मान झाला आहे. हा गौरव सोहळा भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात अत्यंत उत्साहात पार पडला.
विशेष म्हणजे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी "उद्योगऊर्जा" संस्थेच्या सक्रिय, तेजस्वी आणि प्रेरणादायी महिला सदस्यांनी व्यासपीठ गाठून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा बहुमान स्वीकारला. हा केवळ पुरस्कार नाही तर महिलाशक्तीच्या उद्योग सहभागाचे,नेतृत्वाचे आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे.
या कार्यक्रमाचे नेतृत्व संस्थेच्या अनुभवी मार्गदर्शक चित्रा राऊत मॅडम आणि सुसंवादक अरुण सोनवणे सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. त्यांच्यासोबत व्यासपीठावर आरती चोरगे, आसावरी नगरदेवळेकर, विजयशिला सावंत-तांबे, सुषमा शिर्के, शमिका मुणगेकर, छाया गचके, मीना पपनोई, मृणाल भट, लता शिरसाट, उल्का तेंडुलकर, मिनल दिल्लीकर या कार्यक्षम महिला उद्योजकांची उपस्थिती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
उद्योगऊर्जा संस्थेने गेल्या ६ वर्षांत ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून शेकडो मिटिंग्स, ट्रेनिंग्स आणि नेटवर्किंग कार्यक्रमांचे आयोजन करून हजारो MSME उद्योजकांना मार्गदर्शन, संधी आणि ऊर्जा दिली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणजे एकत्रित ₹१०.५० कोटींचा व्यवसाय या यशामागे फक्त उपक्रम नाहीत,
तर आहे एक ध्येय, एक जिद्द, एक बांधिलकी, आणि एक विचार आहे आणि तो म्हणजे "प्रत्येक उद्योजक, कोट्याधीश उद्योजक व्हावा या निमित्ताने उद्योगऊर्जा संस्थेचे प्रमुख संघटक आणि प्रेरणास्त्रोत ब्रॅंडबॉन्ड निलेश सर यांनी MSME उद्योजकांना आवाहन केले की, नेटवर्किंग माध्यमातून आपल्या ओळखी वाढवा, प्रशिक्षण घ्या, नेतृत्वगुण विकसित करा, आपला व्यवसाय भक्कम करा व त्या माध्यमातून एकंदरच आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी अधिकाधिक MSME व्यावसायिकांनी संस्थेमध्ये सहभागी होऊन आपला व संस्थेचा सर्वांगीण विकास करावा.चला भेटूया, परस्परांना "ऊर्जा" देऊया... असे म्हणत तब्बल साडेसहा वर्षे लहान-मध्यम व्यवसायिकांसाठी एक मजबूत संघटन उभारणाऱ्या आणि सध्या संपुर्ण महाराष्ट्रात "गर्जा महाराष्ट्र ऊर्जा महाराष्ट्र!!!" या स्फूर्तिदायक घोषणेच्या साथीने "एक उद्योजक, कोटी उद्योजक!" म्हणत "प्रत्येक उद्योजक, कोट्याधीश उद्योजक व्हावा." यासाठी ऑनलाईन-ऑफलाईन सतत प्रयत्नशील असणारी उद्योगऊर्जा संस्था सध्या आपला 7 वा सप्तरंगी वर्धापनदिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याची तयारी करत आहे.
उद्योजकतेला ऊर्जा देणारी "उद्योगऊर्जा" चळवळ आता प्रत्येक व्यावसायिकाच्या सहभागाची वाट पाहते आहे.
---------