प्रभाग क्रमांक १२ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सामान्यांचा आवाज – अभिजीत दिलीप सांगळे निवडणुकीच्या रिंगणात.
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १२ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सर्वसामान्य जनतेतून आलेले, संघर्षातून घडलेले आणि कायम जनतेसोबत उभे राहिलेले नेतृत्व श्री. अभिजीत दिलीप सांगळे यांना उमेदवारी दिली आहे.
लहानपणापासून आगाशी, चाळपेठ, उंबरगोठण, पूरापाडा व संपूर्ण प्रभागात वाढलेले अभिजीत सांगळे हे केवळ उमेदवार नाहीत, तर लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा घरचा माणूस आहेत. कोणतेही पद किंवा सत्ता नसताना त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे.
पाणीटंचाई, खराब रस्ते, गटारांची समस्या, स्ट्रीट लाईट, नाविक व कष्टकऱ्यांचे प्रश्न, समाजमंदिर व सार्वजनिक सुविधा यांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कोविड काळ असो वा आपत्तीची वेळमदतीसाठी सर्वप्रथम पोहोचणारा चेहरा म्हणून त्यांनी विश्वास निर्माण केला.
“राजकारण नव्हे, सेवा” या ब्रीदाने काम करत अभिजीत सांगळे यांनी समाजसेवेला आपले जीवनकार्य मानले आहे. महानगरपालिकेत गेल्यावर पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सर्वसामान्यांना न्याय व मूलभूत सुविधा हा त्यांचा ठाम अजेंडा आहे.
नियमित पाणीपुरवठा, चांगले रस्ते, सुरक्षित परिसर, महिलांसाठी सन्मान व सुरक्षितता, तरुणांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा या मुद्द्यांवर ते ठामपणे उभे आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विचारधारेनुसार मराठी माणसाचा स्वाभिमान, सामान्यांचा हक्क आणि विकासातील समानता यासाठी अभिजीत सांगळे हे प्रभाग क्रमांक १२ मधील जनतेचा खरा आवाज ठरणार आहेत. प्रभागातील प्रत्येक नागरिकाने विकास, प्रामाणिकपणा आणि विश्वासासाठी एकत्र येत अभिजीत दिलीप सांगळे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------
