सामाजिक क्षेत्रातील रामभाऊ जाधव कर्तबगार कार्यकर्ता हरपळा.

सामाजिक क्षेत्रातील रामभाऊ जाधव कर्तबगार कार्यकर्ता हरपळा.

कुलाबा प्रभात वृत्तसेवा

 खडकीतील हसमुख तसेच गोरगरीब जनतेच्या समस्यांन विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन त्याचे निवारण करणारा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा अतिशय प्रामाणिक वृतीने सामाजिक क्षेत्रात एक कर्तबगार कार्यकर्ता म्हणून परिचित छावा संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख राम जाधव यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी सांगवी येथील त्यांच्या निवास स्थानी हृदय विकाराने त्यांचे दुःखद निधन झाले.

कै राम जाधव हे खडकी, बोपोडी औंध रेंजहिल्स व सांगावी परीसरातील एक सामाजिक व राजकीय चळवळीतील एक महान व्यक्ती म्हणून.राम दुलबाजी जाधव यांची ओलख होती.

३१ डिसेंबर २०२५ रोजी ममता नगर सांगावी येथे रात्री ८:१५ वाजता हृदय विकाराने निधन झाल्याने छावा संघटना,पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र इतर संघटनांच्या माध्यमातून असंघटित कामगार, नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा लढवय्या कार्यकर्ता हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  

रामभाऊ जाधव हे पुरोगामी विचारसरणीचे एक लढवय्या व्यक्ती म्हणुन सुपरिचीत होते महाराष्ट्राचे कुल दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज तसचे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते छावा संघटनेच्या चळवळीतून काम करीत होते. त्यांच्या अचानक जाण्याने खडकी, बोपोडी, दापोडी, औंध, रेंजहिल्स व सांगावी परीसरातील नागरिक हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी निशा, मुलगा प्रथमेश व मुलगी शिवानी तसेच सून, भाऊ व भावजय असा मोठा मित्र परिवार आहे.

---------