विणेगाव येथून सुदाम लक्ष्मण धारपवार हा व्यक्ती बेपत्ता.
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक पोलीस दुरक्षेत्र हद्दीत येत असणाऱ्या विणेगाव येथिल सुदाम लक्ष्मण धारपवार ही व्यक्तीदिनांक ०९ /०२/२०२२ रोजी दुपारी ०१:०० वा.चे सुमारांस घराचे जवळ असलेल्या आंब्याचे झाडा जवळुन कोणासही काहीएक न सांगता कोठेतरी निघुन गेलेला आहे.
याबाबत खालपूर पो.स्टे.येथे सौ. सिमा सुदाम धारपवार यांनी दिलेली खबर कि त्यांचे पती सुदाम लक्ष्मण धारपवार हे मनोरुग्ण असुन घराचे जवळ असलेल्या आंब्याचे झाडा जवळुन कोणासही काहीएक न सांगता कोठेतरी निघुन गेलेला आहे.
याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसींग रजि. नं. ०६/२०२२ प्रमाणे दिनांक १४ /०२/२०२२ रोजी दाखल आहे.
बेपत्ता असलेले सुदाम लक्ष्मण धारपवार यांचे वय. ४८ वर्षे, रंग निमगोरा, उंची १७२ सेमी, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, डोळे काळे, केस काळे साधारण पांढरे, कपाळावर गंध लावलेले, ओळख खुन कपाळावर चामखिळ निमगोरा रंगाचा, नेसुस अंगात लाल रंगाचा टिशर्ट, काळे रंगाची फुल पॅन्ट, आहे.
या वर्णनाचा व्यक्ती कोणास अढळल्यास यांनी खालापूर पोलीस ठाणे फोन नबंर :- ०२१९२-२७५०३३ तपासिक अंमलदार :- आर.एन. बागुल मो.नं. ८९८३२४१११४ यांना संपर्क करावा असे आवाहन पोलीसांनकडुन करण्यात आले आहे.
---------
