पत्रकार सामन्यात पनवेल पत्रकार संघ विजयी

 पत्रकार सामन्यात पनवेल पत्रकार संघ विजयी.

कुलाबा प्रभात वृत्तसेवा

पत्रकार दिनाचे औचित्य साधून भाताण येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित वेध विकासाचा पत्रकार चषक 2026 या स्पर्धेत पत्रकारांच्या झालेल्या सामन्यात पनवेल पत्रकार संघाने बाजी मारली आणि विजयश्री खेचून आणली.या सामन्यांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्याहस्ते करण्यात आले.

भाताण येथे पत्रकार चषकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जत खालापूर पत्रकार संघ आणि पनवेल पत्रकार संघ यांच्यात दोन षटकांचा सामना खेळवण्यात आला. यावेळी नाणेफेक जिंकून कर्जत खालापूर पत्रकार संघाने प्रथम फलंदाजी स्वीत्कारली. यावेळी दोन षटकांमध्ये 16 धावा फटकावल्या आणि पनवेल पत्रकार संघापुढे 17 धावांचे आव्हान ठेवले. 

प्रत्युत्तरादाखल मयुर तांबडे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल संघाने एकही विकेट न पाडता शेवटच्या बाॅलपर्यंत सामन्यात चुरस राहीली .शेवटच्या एक चेंडूत एक धाव असताना चौकार लागल्याने पनवेल पत्रकार संघ विजयी ठरला. या सामन्याचा मानकरी चौलकर ठरले त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. पनवेल पत्रकार संघाला ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. 

प्रमुख मान्यवर मनसे तालुकाध्यक्ष रामदास पाटील, अड. संतोष खांडेकर, माजी उपसभापती वसंत काठवले,उद्योजक मोहन लबडे, अनंता बुवा पाटील,भाजपा कामगार प्रदेश अध्यक्ष,अविनाश गाताडे,भाजपा विभागीय अध्यक्ष,शिवाजी माळी,शिवसेना नेते,अनिल पाटील,मा. प्रभारी सरपंच नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाखांबले,मा.उपसरपंच महादेव पाटील मा. उपसरपंच तानाजी पाटील सरपंच भाताण अरुण पाटील मा.उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अनिल काठवले ग्रामपंचायत सदस्य,संजय घरत,सरपंच कसलखंड,नंदू पाटील, खालापूर,पनवेल,कर्जत,तालुक्यातील पत्रकार मोठया संख्येने हजर होते.

---------