पालघर जिल्ह्यात मागील 3 वर्षात 2065 बालकांना नवजात शिशु अतिदक्षता (NICU) विभागाचा लाभ.
महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार.
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
नवजात कमी वजनाची बाळ किंवा अकाली मुदत पूर्व जन्माला आलेली बाळ यांना जन्मजात गंभीर आजार असल्यास त्यांच्या जीवाला धोका संभावू शकतो. प्रसूती पश्चात बाळाला झटके येणे, बाळाच्या श्वासाची गती जलद चालणे, बाळाला कावीळ, धनुर्वात तसेच जंतू संसर्ग पासून संरक्षण करण्यासाठी नवजात शिशु अतिदक्षता (NICU) विभागाची गरज असते. निरोगी माता निरोगी बाळ हे शासनाचे ध्येय असून मातेच्या गरोदरपणापासून ते प्रसूतीदरम्यान सर्व सुविधा आरोग्य विभागमार्फत पुरविण्यात येतात, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने "महात्मा फुले जन आरोग्य योजना" अंतर्गत अशा बालकांना उपचार मोफत मिळण्याची तजवीज केली आहें. नवजात बाळासह मातेचीही काळजी घेतली जाते, नवजात बालमृत्युंचे प्रमाण रोखण्यासाठीच अशा योजनाचा वापर केलं जातो. या योजनेच्या माध्यमातून खासगी रुग्णालयात अत्यंत महागाडी व खर्चिक उपचार पद्धती शासनाच्या वतीने मोफत मिळत आहें.
गरिबांसाठी नवजात शिशु (NICU) उपचार "संजीवनी"
प्रसुतीपश्चात नवजात बालकांची उपचार पध्दती खाजगी दवाखान्यात अत्यंत महागडी आहे. सामान्य तसेच गरीब कुटुंबियांना खाजगी दवाखान्याचा खर्च पेलवणे शक्य होत नाही. परिणामी अनेकदा उपचाराअभावी नवजात बालकांना जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही; किंवा कर्जच्या ओझ्याखाली बालकांचे उपचार केले जातात. "महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या" स्वरूपात पालकांना नवसंजीवनी प्राप्त झाल्याची भावना आहें.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
शासनाच्या वतीने बालमृत्याचे प्रमाण थांबविण्यासाठी नवाजात शिशु अतिदक्षता (NICU) विभागातील उपचार मोफत मिळविण्यासाठी "महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा" जास्तीत जास्त अवलंब पालकांनी करावा व योजने अंतर्गत हे उपचार देणाऱ्या रुग्णालयानी पालकांना सहकार्य करावे.
राजेंद्र ढगे
आमची वसई रुग्णमित्र
---------

