तुपगाव येथून कु.अंजली निलप्पा शिंगे बेपत्ता.

 तुपगाव येथून कु.अंजली निलप्पा शिंगे बेपत्ता.

कुलाबा प्रभात वृत्तसेवा

खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक पोलीस दुरक्षेत्र हद्दीत येत असणाऱ्या तुपगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या कु.अंजली निलप्पा शिंगे हि वय २३ वर्षे ही १०/१२/२०२५ रोजी सकाळी ०८.३० वा मी कामाला जाते असे सांगुन घरातून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही.

घरातील व्यक्तीनी तीचा Just घेतला असून ती राहते घरी परतली नसल्यामुळे मुलीचे वडील निलप्पा लिंगप्पा शिंगे यांनी खालपूर पो.स्टे.येथे कु.अंजली निलप्पा शिंगे ही बेपत्ता असल्याबाबत खबर दिलेली असून पोलीस ठाण्यात रजि. नं. ४४/२०२५ प्रमाणे दिनांक १३/१२/२०२५ रोजी  दाखल आहे. 

सध्या रा. तुपगाव, ता. खालापूर जि. रायगड, मुळ रा. हुवीनहल्ली, ता.सिंदगी, जि. विजापुर, राज्य-कर्नाटक  येथील असून बेपत्ता असलेल्या मुळीचे नाव कु.अंजली निलप्पा शिंगे वय.२३ वर्षे रंग-गोरा, उंची ५ फुट ४ इंच अंदाजे, अंगाने-सडपातळ, केस-काळे व लांब, दोन्ही कानात सोन्याच्या बाळया, उजव्या हातात साध्या मन्यांचे ब्रेसलेट, अंगात नेसुस- निळया रंगाचा पंजाबी ड्रेस व ओढणी, पायात निळसर रंगाची सॅन्डल आहे.

या वर्णनाची महिला कोणास अढळल्यास यांनी खालापूर पोलीस ठाणे फोन नबंर :- ०२१९२-२७५०३३ तपासिक अंमलदार :- आर.एन. बागुल मो.नं. ८९८३२४१११४ यांना संपर्क करावा असे आवाहन पोलीसांनकडुन करण्यात आले आहे.

---------