्“गुन्हेगारांचे कर्दनकाळ आता रसायनीत; रसायनीत कायदा-सुव्यवस्था बनणार "कनखर”
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
रसायनी पोलिस ठाणे येथे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाचा कार्यभार अभिजित अरविंद भुजबळ यांनी बुधवार दि. १८ फेब्रुवारीपासून अधिकृतपणे स्वीकारला आहे.
यापूर्वी दोन वर्षे प्रभावी कामगिरी बजावणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांची पुढील सेवेसाठी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आलेले पिआय अभिजित भुजबळ हे तब्बल १७ वर्षांच्या समृद्ध अनुभवासह सेवेत रुजू झाले आहेत.
भुजबळ यांनी ठाणे शहर गुन्हे शाखा, गडचिरोली परिक्षेत्र तसेच अलिबाग पोलिस ठाणे येथे धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. अलिबाग वाहतूक शाखेत कार्यरत असताना त्यांनी शिस्तबद्ध कारभाराची छाप पाडलेली असून रसायनी परिसरातील नागरिकांनी आपल्या अल़्पवयिन पाल्याना दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालविण्यास देऊ नये असे कुलाबा प्रभात वृत्तपत्र प्रतिनिधी सोबत बोलताना केले.
अल़्पवयिन दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालविताना अढळल्यास पालकावर गुन्हा दाखल होऊ शकणारा असल्यामुळे पालकांनी खबरदारी घेतली पाहीजे असे बोलताना सांगितले.
अभिजित अरविंद भुजबळ यांनी पोलिस सेवा कारकिर्दीत तब्बल १५६ चैन स्नॅचिंग गुन्ह्यांची उकल करून सुमारे साडेतीन किलो सोने हस्तगत करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा शिताफीने तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचा त्यांचा लौकिक आहे. पोलिस वर्तुळात ते “गुन्हेगारांचे कर्दनकाळ” म्हणून ओळखले जातात.
सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना गडचिरोली येथे शासनाकडून आंतरिक सुरक्षा पदक व खडतर सेवा पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
रसायनी पोलीस ठाणे येथे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अभिजित भुजबळ यांनी रसायनी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून नागरिकांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
