शेती अवजारे  बनवून घेण्यासाठी लगबग !

शेती अवजारे  बनवून घेण्यासाठी लगबग !



काशिनाथ जाधव / प्रतिनिधी



तुरळक आगमनाने बळीराजा शेतामध्ये पेरणीचा करण्यासाठी सज्य झाले आहे.मात्र शेतीच्या मशागती साठी अवजारे यांची मोठी आवश्यकता असते. यामुळे तालुक्याच्या ठीकाणी  जावून अथवा गावामध्ये काम करुन घेत आहेत.शेतीसाठी लागणारे साहित्य विले,खुरपणे,नागरांचे फाळ,घमेले,फावडे,टिकाव,खरेदि करण्याची लगबग सुरु झाली आहे.तर काही शेतकरी गावामध्ये असलेल्या लोहार समाज यांच्या कडुन शेती अवजारे बनवून घेत आहे.


सध्या कोरोना हा असल्यामुळे त्यांची भिती अजूनही गेलेली नाही.मात्र कमी वेळामध्ये आपले काम करून पुन्हा घरच्या मार्गाकडे रवाना होत आहे . कोरोना च्या या महामारीमध्ये आठवड्यातील बाजार मोठ्याप्रमाणावर भरत नसल्यामुळे नाइलाजास्तव गावामध्ये जावून आपले काम करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.तर काही शेतकरी वर्गांनी आपल्या जवळ असलेल्या शेतीची अवजारे त्यांचाच वापर करुन घेत आहेत.


पावसाचे  आगमन हवे तसे होत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.मात्र तुरळक पावसाच्या आगमनाने शेतक-याला दिलासा मिळत आहे. पुढे हि चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे.यामुळे या जून महिन्यामध्ये पावसाचे आगमन होत असून वातावरणात उष्णतेचा सामना करावा लागत आहे.मात्र अचानक पणे ढग जमा होवुन शेतक-यांना दिलासा मिळत आहे.यामुळे रणरणत्या उन्हात शेतीच्या मशागतीला जोर धरलेला दिसून येत आहे. यामुळे पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे,औषधे खरेदी झाली असून आता शेतीसाठी लागणारे अवजारे बनवून घेत आहे.


============================


कुलाबा प्रभात नवलेखा पेज वाचकांसाठी खास माहिती ,या माहिती नुसार नियमित वाचा कुलाबा प्रभात नवलेखा पेज.


 

जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभात नवलेखा पेजच्या इतर न्युज वाचण्यासाठी, आपल्या मोबाईल मध्ये कुलाबा प्रभात नवलेखाची असलेली कोणतीही  न्युज लिंक ओपण केल्यानंतर All, ब्रेकिंग,राजकीय  च्या वरती रेड कल्लर मध्ये दिसत असलेल्या कुलाबा प्रभातरव टच केल्यावर जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभातच्या इतर न्युज आपण वाचू शकता.

 

वाचकांसाठी ही खास सुविधा फक्त आणी फक्त कुलाबा प्रभात नवलेखा पेज वरच.

 

----------------------------------------

 

कुलाबा प्रभात साठी - चौक,कलोते, खालापूर,खोपोली,सावरोली,लोहोप,वाशिवली,कैरे,कासप,चावणे,पनवेल,

पोयंजे,अजिवली,सावळे,पलस्पे, सोमाटणे,रसायनी,गुलसुंदे,आपटा,दांडफाटा,रिस आदी विभागात प्रतिनिधी नेमणे आहे,तरी दहावी उत्तीर्ण व लिखाणाची आवड असणाऱ्यांनी संपर्कं साधावा.

 

कुलाबा प्रभात - संपादक अमोल सांगळे,

उपसंपादक वैभव पाटील,

कुलाबा प्रभात मार्गदर्शक - राकेश खराडे

 

============================