माजी.उपसभापती श्यामभाई साळवी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमात उत्साहात साजरा !

माजी.उपसभापती श्यामभाई साळवी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमात उत्साहात साजरा !




कुलाबा प्रभात वृत्तसेवा

खालापूर पंचायत समिती माजी.उप सभापती श्यामभाई  साळवी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमात नढाळ येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. नढाळ गावातील तसेच नागरिकांना कर्जत - खालापूर -खोपोली कडे तसेच पनवेल - नवी मुंबई - मोहोपाडा कडे  जाण्यासाठी नढाळ Nh रस्ता क्र.४ समोर वाहनाची प्रताक्षा करत ताटकळत रस्त्याच्या बाजुला भर उन्हात तर पावसाळ्यात भर पावसात भिजत वाहनाची प्रतिक्षा करत उभे राहवे लागत होते. 



समाज हिताची प्रखर जानिव असलेले श्यामभाई साळवी यांनी या समस्सेची दखल घेऊन सुसज्ज अशी  व्यवस्था केली. व याचे लोकार्पण वाढदिवसा निमित्ताने शिवसेना चौक जिल्हापरिषद विभाग प्रमुख सुधीरशेठ ठोंबरे व चौक जिल्हा परिषद सदस्य मोतिराम ठोंबरे यांचे हस्ते फित कापून नढाळ बस थांबा येथे निवारा व्यवस्था करून  तीचा लोकार्पण सोहळा वाढदिवसा निमित्ताने करण्यात आला.






बस थांबा निवारा सुसज्ज  व्यवस्था व एकदिवसीय क्रिकेट सामने सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे नढाळ ग्रामस्थांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.तदनंतर श्यामभाई साळवी यांना उपस्थितांनी वाढदिवसाच्या आरोग्य संपन्न शुभेच्छा दिल्या.






बस थांबा सुसज्ज  निवारा व्यवस्था लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यावर वाढदिवसा निमित्ताने एक दिवसीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.यावेळी शिवसेना चौक जिल्हापरिषद  विभाग प्रमुख सुधीरशेठ ठोंबरे,चौक जिल्हा परिषद सदस्य मोतिराम ठोंबरे,राजू मोरे,माजी.उपसरपंच सुभाष प्रबळकर,निखिल मालुसरे,गिरिश जोशी,प्रशांत खांडेकर,सुनिल गायकवाड ,सुनिल प्रबळकर,सदा दळवी उपस्थित होते.लोकार्पण सोहळा तसेच एक दिवशीय क्रिकेट सामने यशस्वि पार पाडण्यास 



समिर दळवी,अॕड.सचिन चाळके,प्रविण नलावडे,दिनेश पवार हेमंत दळवी,सागर नघाने,हर्षल दळवी,सुबोध पाटील,रोहन दळवी,मनोहर गायकवाड ,संजय डोंगरे ,नरेश भोईर,संतोष डोंगरे ,दिपक गरुडे,प्रभाकर सावंत संतोष भोसले तसेच चौक वि. संघटक सौ सुनंदा जमदाडे बुथ प्रमुख सौ सिद्धि गायकवाड नढाळ उपशाखा संघटक सौ मनिषा पाटील नढाळ आदिवासी वाडी उपशाखा संघटक सौ अनुसया वाघमारे लोधीवली ग्रामपंचायत संघटक सौ पुष्पा चाळके, सौ कुंदा चौधरी, यांनी अथक मेहनत घेऊन लोकार्पण सोहळा तसेच एक दिवशीय क्रिकेट सामने यशस्वि नियोजनात पार पाडले.

===========

जाहिरात 

===========



===========



===========

===========


===========

दर रविवारी प्रकाशित होणारे
वाचकांचा उदंड प्रतिसादाने  रायगड जिल्ह्यात लोकप्रिय असलेले 
साप्ताहीक  कुलाबा प्रभात  नियमित  वाचा.
रायगड  जिल्ह्यात  सर्व पेपर विक्रेत्यान कडे उपल्बध.


============

  कुलाबा प्रभात वृत्तपत्र  
         मार्गदर्शक
राकेश काशिनाथ खराडे


============


                         संपादक 
            कुलाबा प्रभात वृत्तपत्र
               अमोल किसन सांगळे

============

कुलाबा प्रभात मार्गदर्शक - राकेश खराडे

कुलाबा प्रभात  संपादक - अमोल सांगळे

कुलाबा प्रभात उपसंपादक - वैभव पाटील

 ============