रसायनी पोलीस स्टेशनला नवे नेतृत्व,सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्थेसाठी ठोस पावले.

  रसायनी पोलीस स्टेशनला नवे नेतृत्व.

सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्थेसाठी ठोस पावले.

कुलाबा प्रभात वृत्तसेवा

रसायनी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी मा.अभिजीत अरविंद भुजबळ साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व देवळोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. देवेंद्र (देवा) अनंत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व पुढील कार्यकाळासाठी विश्वास व्यक्त केला.

या भेटीदरम्यान रसायनी विभागातील विविध प्रशासकीय, सामाजिक व विकासात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः रसायनी - पाताळगंगा औद्योगिक परिसरातील सामाजिक सलोखा टिकवणे, कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करणे, तसेच नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित आणि शांततामय वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

परस्पर समन्वय, सहकार्य आणि लोकसहभागातून विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

                        जनतेसाठी संदेश 

“सुरक्षित रसायनी - सशक्त रसायनी” हा संकल्प पूर्ण करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्रितपणे कार्यरत राहतील.

---------